पुरंदर ! येणारे वर्ष दूध व्यवसायासाठी फायदेशीर : आमदार रोहित पवार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
राजस्थान, महाराष्ट्रातील जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुध उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. सद्या सुरू असेलेला अतिरिक्त पाऊस , वाढलेले पेट्रोल - डिझेलचे दर या सर्व गोष्टींमुळे दुध उत्पादन खर्च वाढला त्यामुळे दुधाचे दर वाढले असून येणारे वर्ष दुधाच्या बाबतीत चांगले वर्ष असणार असल्याचा विश्वास  आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.
         पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आ. पवार बोलत होते. 
यावेळी पुणे जिल्हा मध्य.सह.बँकेचे चेअरमन प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे , जि.प.चे बांधकाम समितीचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे , लक्ष्मण गोफणे, डॉ.वसंत दगडे, अनिल चव्हाण, संदीप धायगुडे,  उत्तम धुमाळ , विजय थोपटे उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
राज्यातअतिरिक्त पावसामुळे कांंदा खराब झाला त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच अनेक राज्यांमध्येही अतिरिक्त पावसामुळे कांदा खराब झाला आहे. त्यामुळे राज्यांत जिथे जिथे अतिरिक्त पाऊस झाला आहे. तेथील शेतात पाणी साठून पिकांचे नुकसान झाले आहेत . तेथील शेतक-यांचे सरसकट तातडीने पंचनामे करण्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी
पक्षातील आमदारांनी मुख्यमंञी , महसुलमंञ्यांकडे मागणी केली असल्याचे आ.रोहित पवार यांनी सांगितले.

To Top