सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
पाचगणी ता.महाबळेश्वर येथील टॅबललॅडवर दि.२० रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने घोडे मालक असलेले शंकर गायकवाड संभाजी दामगुडे आणी सुनील कांबळे यांनी तेथीलच एका स्टॉलच्या पाठी मागील झाडाखाली तिनही घोडे बांधून ते पावसा पासून स्वताचा बचाव व्हावा या भावने पोटी दुसर्या स्टॉलमध्ये जाऊन थांबले होते आणी क्षणार्धातच विज मोठ्या आवाजात कडाडली आणी सर्वच स्टॉलधारक या आवाजाने घाबरुन गेले तेवढ्यात हि विज घोडे बांधलेल्या ठिकाणी कोसळली आणी तिनही घोड्यांचा प्राण गेला .या घोड्यांचे मालक विज कोठे पडली हे पाहण्या साठी बाहेर आले असता मृत घोडे पाहुन या तिनही मालकांचे आश्रुंचे बांध फुटले .या दुर्दैवी घटनेने पाचगणी परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे . पाचगणी हे ठिकाण देशात थंड हवेचे ठिकाण
म्हणून ओळखले जाते. तेथे येणार्या पर्यटकांना घोडे सवारीचा आनंद घेता यावा या साठी अनेक घोडे व्यवसायीक आपली किमती असणारी घोडी घेऊन टॅबललॅडवर येतात .आणी त्या वर स्वार होऊन आनंद मिळविण्या साठी हे पर्यटक घोडे भाड्याने घेऊन मनसोक्त आनंद घेतात .आपला घोडा सुंदर आणी देखना असावा या साठी पाचगणी येथील घोडे शोकीन मालक कित्येक लाख रुपये खर्च करुन देखणी घोडी खरेदी करुन त्यांना आवाक दररोज चारा आणी खुराक देऊन त्यांना गुटगुटीत ठेवतात
त्यांच्यावर पोटच्या मुला सारखे प्रेम करुन त्याला प्रशिक्षण देऊन शब्दांच्या तालावर हे घोडे मालक नाचवतात येथील घोडे मालकांन मध्ये कुणाचा घोडा देखणा याची स्पर्धा नेहमीच लागत असते येथील घोडे हे आपल्या वर स्वार होण्या साठी येणार्या प्रत्येक पर्यटकांना दोन्ही पायावर ऊभे राहुन प्रणाम करतात हे येथील घोड्यांचे वैभव समजले जाते लहान बाळा पासुन महिला मुली आबालवृद्ध वयोवृद्ध जेव्हा घोड्यावर बसून सवारी करतात त्यांना कुठल्याही प्रकारची ईजा होऊ नये म्हणून हे मुके प्राणी काळजी घेताना दिसतात .पण दुर्दैवाने दि. २० रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक पणे या अनेक गुण संपन्न असणार्या या तीन घोड्यांनवर काळाने झडप घालून घोडे मालकांच्या तबेलाला क्षणार्धात स्मशान बनवल्याने घोडे मालकांनी एकच हंबरडा फोडला .या तिन्ही घोडे मालकांच्या कुटुंबातील लहाना पासुन मोठ्या पर्यंत आपल्यातील एक कर्तबगार आणी कुटुंब चालवणारी व्यक्तीचे निधन झाले आहे या शोकाकुल वातावरणात वावरताना दिसत आहेत .या तिन्ही घोडे मालकांचा प्रपंच या घोड्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहे याचे भान मायबाप सरकारने ठेवून त्यांना तातडीने शासन निर्णया नुसार आर्थिक मदत करावी अशी मागणी पाचगणी येथील नागरिकांनी केली आहे .