भोर ! उद्योग व्यवसायात झोकून द्या : प्रा.नामदेवराव जाधव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
तालुक्याची गावची तसेच स्वतःची आर्थिक प्रगती सुधारायची असेल तर उत्पादक होऊन विक्रेते स्वतःच होणे गरजेचे आहे.म्हणूनच नोकरीच्या पाठीमागे न धावता उद्योग व्यवसायात झोकून द्या असे मत प्रा.नामदेवराव जाधव यांनी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.
     पांडे ता.भोर येथे शूरवीर मावळी संघटना भोर अध्यक्ष पत्रकार वैभव धाडवे यांच्या माध्यमातून रविवार दि.१६ घेण्यात आलेल्या उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात जाधव बोलत होते.संघटनेचे अध्यक्ष वैभव धाडवे यांनी सामाजिक बाधीलकी जपत उद्योग व्यवसाययामध्ये वाढ होण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.यावेळी राजगड पोलीस निरीक्षक सचीन पाटील,
 बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे ,विलास बांदल, उद्योजक लखन दळवी , किरण गाडे, कृष्णाथ लंके,विजय गरुड, प्रविण सुर्वे ,नितीन थोपटे,शंकर धाडवे ,महाराष्ट्र उद्योग समूहाचे अमित गाडे,आदित्य बोरगे,महिला बचत गटाचे अध्यक्षा,सदस्य तसेच तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

To Top