भोर ! संतोष म्हस्के ! राजवाडा चौकातील बेशिस्त वाहन चालकांना पोलीसीखाक्या : तीस हजारांचा दंड वसूल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील राजवाडा चौकात नित्याच्याच असणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत चक्क ३० हजार रुपयांचा दंड वसूल केल्याने बेशिस्त वाहन चालकांना चांगलाच साप बसला आहे.
      राजवाडा चौकात प्रांत कार्यालय ,तहसील कार्यालय ,तसेच साठे खत नोंदणी कार्यालय असल्याने या परिसरात येणारे चार चाकी व दुचाकी वाहन चालक चौकातच गाड्या पार्किंग करून आपले काम करण्यासाठी जात असतात.मात्र या चौकात गाड्या पार्किंग केल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक दिवसांपासून नाहक त्रास सहन करावा लागत होता.याची दखल घेत पोलीस कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, सादिक मुलानी, सागर झेंडे तसेच होमगार्ड भीमराव रणखांबे यांनी कारवाई करीत दंड वसूल करीत कारवाई केली.
To Top