वाई ! जोरच्या सपकाळ कुटुंबियांना आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते ८ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : दौलतराव पिसाळ
२१ जुलै २०२१ च्या अतिवृष्टी मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या अनिता सपकाळ व मुलगा सचिन सपकाळ यांचे  वारस असलेले पांडुरंग सपकाळ यांना आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते आणी वाईचे तहसीलदार रंजित भोसले यांच्या ऊपस्थितीत शासनाकडुन  मंजूर होऊन आलेेला ८ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला .
यावेळी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप विध्दुत मंडळाचे ऊपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी जोर गावच्या महिला गावकामगार तलाठी विना पुंडे जोर गावचे ग्रामस्थ व इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणी मान्यवर कार्यकर्ते  ऊपस्थित होते .
सविस्तर माहिती अशी की २१ जुलै २०२१ या दिवशी वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जोर या गावावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी  निसर्गाचा कोप झाल्याने डोंगर माथ्यावर  ढगफुटी होऊन झालेल्या अतिवृष्टी मुळे काही 
क्षणातच या डोंगर पायथ्याशी असणार्या कोळी वस्तीवर डोंगर कड्यावरील मातीचा ढिगारा कोसळला त्याच्या सोबत पाण्याचे लोट मोठ मोठाली दगडी  माती पाण्या सोबत  वाहुन येत असताना त्या वेळी या महाभयंकर घटनेची माहिती कोळी वस्तीवर राहणार्या इतरांना देण्या साठी सौ.अनिता पांडुरंग सपकाळ वय ३५ या घरा बाहेर उभ्या राहुन ओरडून माहिती देत असतानाच आणखी एक मातीचा ढिगारा त्यांच्या समोर कोसळून तो क्षणार्धात  सौ.अनिता यांच्या दिशेने आला आणी त्या दगड माती व आलेल्या पाण्याच्या लाटे सोबत वाहुन जावु लागल्याचे अतीभयंकर दृश्य हे त्यांच्या  मुलगा सचिन पांडुरंग सपकाळ वय २० याने पाहता क्षणी आपल्या आईला वाचविण्या साठी त्याने या माती आणी पाण्याच्या वेगवान प्रवाहात उडी घेऊन आई त्या लाटेत शोधत असतानाच तोही वाहुन गेला आणी या माया लेकरांचा तेथील गाळात खोलवर जावुन मृत्यू झाला होता त्या वेळच्या महिला प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूर कर आणी .वाईचे तहसीलदार रंजित भोसले या दोघांनी हे मृतदेह शोधुन काढण्या साठी विविध प्रकारची यंत्रणा राबवून देखील त्यांनी केलेले कष्ट वाया गेले. 
To Top