सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता बारामती येथे पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झालेले वडगाव निंबाळकर येथील नरेश साळवे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने चार लाख रुपये मदत देण्यात आली.
विद्या प्रतिष्ठान बारामती येथे आज महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते वडगांव निंबाळकर येथिल मागच्या आठवड्यात ओढ्याच्या पुरामध्ये वाहून जाऊन मयत झालेले .नरेश साळवे यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत म्हणुन चार लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. साळवे यांच्या पत्नी अरुणा नरेश साळवे व मुलगा समाधान नरेश साळवे यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय पाटिल, राष्ट्रवादी काँगेस पार्टी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, वडगांव निंबाळकरच्या उपसरपंच संगिता शहा प्रगतशील बागायतदार राजू शहा, मा.तंटामुक्ती अध्यक्ष .दत्तात्रय खोमणे, नानासाहेब मदने यावेळी उपस्थित होते.