बारामती ! तुमचा चांगला चाललेला कारभार आम्ही बाहेर इतरांना सांगतो : अजितदादांकडून 'सोमेश्वर'च्या कारभाराचे कौतुक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे विरोधी अजित पवार यांनी आज बारामती सोमेश्वर कारखान्याबाबत आढावा बैठक घेत संचालकांना चांगले काम करण्याच्या सूचना देत कामकाजाचे कौतुक केले. 
              बारामती येथे सहयोग सोसायटी येथे पार पडलेल्या बैठकीला  सोमेश्वर कारखान्याचे संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी पवार यांनी कारखान्याच्या कामकाजाविषयी माहिती घेत डिस्टलरीच्या विस्तारीकरण बाबत चर्चा केली. तसेच सभासदांना विश्वासात घेऊन उसाच्या गाळापाचे नियोजन करा असे सांगत उसावरील उत्पादन खर्च, कामगार पगार व कारखान्यातील इतर खर्चांबाबत सविस्तर चर्चा केली. 
          यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, प्रणिता खोमणे, प्रवीण कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम, चीफ अकाऊटंट योगीराज नांदखिले यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
To Top