सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात यंदा झेंडूची लागण झाल्यानंतर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली होती.जोरदार पाउसामुळे झेंडूच्या बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोप खराब झाले होते.त्यामुळे तालुक्यातील ठराविकच शेतकऱ्यांचे झेंडूचे मळे शिल्लक राहिल्याने दसरा सणाला झेंडूची आवक कमी होण्याचे चित्र होते.
मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर परराज्यातून झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने ऐन दसऱ्या दिवशीच झेंडूचे भाव गडगडून प्रतिकीलो १०० रूपयांवरून ४० रुपयांवर आल्याने आर्थिक नुकसान होऊन शेतकरी रडकुंडी आले.तर अनेक शेतकऱ्यांचा फुल मळ्यासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. झेंडूचे बाजार भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिन झाला असून ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.