सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिरडस मावळ खो-यातील निरा-देवघर धरण रिंग रोडवरील अनेक गावातील मुलांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय पाहता पुढील शिक्षणासाठी नागरिक व मावळा प्रतिष्ठान यांनी शिरवली हिमा ता.भोर येथे माध्यमिक विद्यालय सुरू करण्याची मागणी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेऊन आमदार थोपटे यांनी राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या माध्यमातून शिरवली हीमा येथे बुधवार दि.५ नवीन इमारतीचे भूमिपूजन केल्याने या विद्यालयामुळे भविष्यातील आदर्शवत नागरिक घडणार आहेत.
शिरवली हिमा येथे लोकनेते शिक्षण महर्षी माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांनी उभारलेल्या राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणा-या माध्यमिक विद्यालयात परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे, मावळा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, व अभेपूरी, माझेरी, गुढे, कुडली, दुर्गाडी, निवंगण, प-हर व शिरवली या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.