सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२०२२ चा बोनस ३० टक्के द्यावा अशी मागणी बारामती तालुका कामगार सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपण सन २०२१-२०२२ मध्ये सभासद शेतकऱ्यांना टनाला ३०२० रुपये असा उच्चांकी दर दिला आहे. तो शासनाने ठरवून दिलेल्या एफ.आर.पी. पेक्षा जादा आहे.
सभासदांप्रमाणेच कामगारांनाही यंदाच्या सन २०२१-२०२२ चे दिपावली सणानिमित्त २० टक्के अॅडव्हान्स बोनस व सानुगृह अनुदान १० टक्के असा एकूण ३० टक्के बोनस देवून सभासदांप्रमाणेच कामगारांचीही दिवाळी गोड करावी. अशी मागणी केली आहे.
मा. कामगार संचालक बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड, कामगार पतसंस्था अध्यक्ष अजित शिंदे, कैलास जगताप, संतोष भोसले, राहुल खलाटे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.