मेढा ! सोमनाथ साखरे ! 'पुस्तकां'च्या गावातला निसर्गवेडा पत्रकार : 'भिलार'च्या सचिन भिलारे यांच्याकडून शेकडो झाडांचे वृक्षारोपण करून संगोपन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : सोमनाथ साखरे
पुस्तकाचे गाव म्हणून ज्या गावचे नाव जागतीक पातळीवर ओळख निर्माण करते त्या गावात जन्मलेले सचिन भिलारे . लहान पणापासून प्राणी मात्रावर प्रेम करणे हा स्वभाव असल्याने सर्पांना कोणी मारताना सचिन भिलारे यांना त्रास होत असे तर राग येणे स्वाभाविकच होते . यामुळे सचिन भिलारे यांनी लहान पणापासून सर्प पकडून तो रानात नेवुन सोडण्याची कला अवगत करून आज पर्यत ते काम अविहरत करीत असल्याने सचिन भिलारे यांना 'सर्प मित्र '  म्हणून संबोधले जाते.
           त्यामुळे गत पाच वर्षापासुन त्याना वनसंवर्धनाचे वेड लागले असून प्रति वर्षी शेकडो झाडे लावून ती जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे.भिलार गाव हे महाबळेश्वर पाचगणी या थंड व पर्याटन क्षेत्राच्या रोडवर असुन या गावात शासनांतर्गत प्रत्येक घरोघरी ग्रंथालय स्थापन करून या गावाला जागतीक पातळीवर नेण्याचे काम शासनाने केले असल्याने या गावाची नविन ओळख झाली आहे. हे  गाव डोंगर माथावर असुन या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती आपोआप लाभलेली आहे. या नैसर्गीक संपत्तीचे जतन करण्याचे काम ग्रामस्थांकडून केले जात आहे. 
              पुस्तकाचे गावात समाज जागृतीचे , समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणारे साप्ताहीक " कृष्णकुंज " चे संपादक सचिन भिलारे हे सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध असताना आता वृक्ष लागवड करण्याचे काम जोमाने करीत असल्याने त्यांची " वृक्षमित्र " अशी ओळख होवु लागली आहे.
              प्रतीवर्षी आंब्याच्या बिया, जांभळीच्या बिया आणि फणसाच्या बिया जमा करून यांचे रोपवन सचिन भिलारे करीत असतात . भिलारमध्ये  डोंगरात खाजगी पडीक जागा असो की वन विभागाची जागा असो दिसली मोकळी की लाव झाड असा सपाटात सचिन भिलारे यांनी लावला असून अनेक झाडे जगविण्यात त्यांना यश आले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करणाऱ्या झाडांना ते स्वतःव आपले सहकार्यांना घेऊन  बाटलीने झाडांना  पाणी देतात. त्यामुळे आज शेकडो झाडे जगलेली आपल्याला या गावच्या परिसरात पहायला मिळतात.
               सर्प मित्र म्हणून ओळख असल्याने अनेक गावातुन त्यांना सर्प पकडण्यासाठी बोलविले जाते . घोणस पकडण्यापासुन आपल्या कार्य किर्तीला सुरुवात करणाऱ्या भिलारेंनी आजपर्यत नाग,   तस्कर साप,   हिरटोळ, मांजऱ्या, मणेर, ,  आदी जातीचे सर्प पकडून त्यांना वन विभागाचे ताब्यात दिले आहेत तर काही वनविभागाचे क्षेत्रात सोडण्यात आले आहेत. सचिन भिलारे यांना सर्प पकडण्या बरोबर जसे वृक्ष लागवडीचे वेड आहे तसे ते बॅटमिडन पण चांगल्या प्रकारे खेळत असल्याचे सांगतात. 
            
        

To Top