सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
भोर : संतोष म्हस्के
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत समजले जाणाऱ्या श्री काळुबाई देवी मांढरदेवी ता.वाई येथे लाखो भाविकांनी नवरात्रीतील सातव्या माळेला गर्दी केली.
नवरात्र उत्सवाला मागील दोन वर्ष कोरोनामुळे बंदी होती. मात्र यंदा शासनाने निर्बंध उठवल्याने राज्यातून भाविक भोर -आंबाडखिंड घाट मार्गे मांढरदेवी गडावर काळुबाई देवीच्या दर्शनासाठी जात आहेत.यामुळे भोर आंबाडखिंड मार्गाला नॅशनल हायवेचे रूप आल्याचे चित्र आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे न बुजवल्याने तसेच साईड पट्टीवरील झाडी-वेली कापली नसल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे.दरम्यान घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आसल्याने ट्राफिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर तुंबले असल्याचे चित्र आहे. भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफिक पोलीस विजय नवले, सुनील चव्हाण, उद्धव गायकवाड, ,दत्तात्रेय खेंगरे ,सटाले ,मखरे,विकास लगस कार्यरत आहेत .