सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व नवरात्र उत्सवाचे औचित्त्य साधून सामाजिक बांधिलकी जपत रविवार दि.२ भोर तालुका हिंदू खाटीक समाजातर्फे रामबाग येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भोर तालुका हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष विनय पलंगे, उपाध्यक्ष दुर्गेश घोणे, सचिव धिरज पलंगे, उपसचिव निखिल घोणे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ थोरात, उपखजिनदार शुभम घोणे, सौरभ गायकवाड, मयूर घोणे, योगेश घोलप, लोकेश घोणे, प्रतीक गायकवाड, ऋषिकेश निकुडे, शिवम पलंगे, राकेश निकुडे आदी समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ समाज बांधव मदन घोणे यांचे विशेष सहकार्य लाभले.