भोर ! आई- वडिलांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा : हभप मंगेश महाराज शिंदे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
जगात सर्वश्रेष्ठ असणारे, लेकरांना समान प्रेम देऊन आयुष्यात काबाड कष्ट करून खडतर प्रवास करीत उच्च शिक्षण देत उच्च पदापर्यंत पोहोचवणारी आई - वडील असतात.अनमोल जन्म देणारी आई तर सांभाळ करणारा पिता यांचे उपकार विसरू नका आई- वडिलांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन ह.भ.प .मंगेश महाराज शिंदे यांनी पोळवाडी (खानापूर) ता.भोर येथील ह.भ. प.ज्ञानोबा  बयाजी पोळ यांच्या प्रथम पुण्यस्मरनानिमित्त झालेल्या किर्तनरुपी सेवेतून केले.
    भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील पोळवाडी ( खानापूर )येथे गरिबीत दिवस काढून घर संसार सांभाळीत उभे आयुष्य सांप्रदायात घालवणारे तसेच कायमच सढळ हाताने मदत करणारे ज्ञानोबा पोळ यांची वीसगाव खोऱ्यासह तालुक्यात ओळख होती असेही महाराज म्हणाले.यावेळी कीर्तनाच्या कार्यक्रमात प्रसंगी शेकडो ग्रामस्थ व महिला,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
To Top