सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
बारामती तालुक्याच्या हद्दीत नीरा-गुळुंचे रस्त्यावर जगताप वस्ती येथे रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर हकीकत, गुळुंचे ता पुरंदर येथील मधुकर शंकर कांबळे वय ६० हे नीरा येथून गुळुंचे येथे एमएच १२ सीझेड ४५३ या दुचाकीवरून घरी जाताना जगताप वस्ती येथे रस्त्यावर पडलेल्या खडी वरून गाडी घसरल्याने हा अपघात झाला यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना नीरा येथील जीवनदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच दिवसात दोन चारचाकी गाड्या पलटी होऊन तीन जण जखमी झाले होते.