पुरंदर ! नीरा येथील व्यक्तीची साताऱ्यात आत्महत्या : सावकारी व पतसंस्था चालकाचा बळी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
नीरा ता. पुरंदर येथील एका व्यक्तीने सातारा येथील वाढेफाटा नजिकच्या राज लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. खासगी सावकार व पतसंस्था चालकांनी त्रास दिल्याने आत्महत्या केल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. त्यांना एक चिठ्ठी घटनास्थळी सापडली आहे. 
         दयानंद किसन गाडे (वय ४६) रा. नीरा वाड नं. ५ असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. लॉज मालक रुतुराज पवार (रा. खेड, ता. जि. सातारा) यांनी याबाबतची तक्रार सातारा शहर पोलिसांकडे दिली आहे. दयानंद हे २९ सप्टेंबरला लॉजमध्ये आले होते. त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह शनिवारी आढळून आला. तो मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी गाडे यांनी दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. खासगी सावकार व पतसंस्था चालकांनी त्रास दिल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा रितसर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
To Top