वाई बिग ब्रेकिंग ! दौलतराव पिसाळ ! विजेची तार तुटून ओढ्याच्या पाण्यात पडल्याने शॉक लागून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
शिरगाव ता. वाई गावचे हददीत कुंभारखानी शिवारात वाघाचा मळा येथे महावितरणच्या तुटलेली तार अोढ्याच्या पाण्यात पडून पाण्यातून निघालेल्या शिरगाव मधील नाईक वस्ती येथील साहिल लक्ष्मण जाधव (वय-९ वर्षे) व प्रतिक संजय जाधव, (वय-१५ वर्षे) या शाळकरी मुलांचा शॉक लागुन मृत्यू झाला. दुपारी १२.‍१५ च्या सुमारास ही घटना  घडली. यामुळे शिरगाव गावावर शोककळा पसरली आहे.
          या बाबत भुईज पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शिरगाव येथील नाईक वस्ती येथील साहिल लक्ष्मण जाधव (वय-९ वर्षे) व प्रतिक संजय जाधव, (वय-१५ वर्षे) व गौरव जितेंद जाधव वय-९वर्षे मेघराज प्रताप जाधव, वय-१४ वर्षे व सार्थक नवनाथ बोडरे वय-१३ वर्षे ही मुले शेळ्यांना चारा आणण्या साठी जात होती. त्यावेळी ओढा पार करुन जात असताना महावितरणची  तुटलेली तार अोढ्याच्या पाण्यात पडून पाण्यातून निघालेल्या शिरगाव मधील नाईक वस्ती येथील साहिल लक्ष्मण जाधव (वय-९ वर्षे) व प्रतिक संजय जाधव या दोघांचा शॉक लागुन  मृत्यु झाला.
          सदरची माहिती समजले नंतर ग्रामस्थांनी दोन्ही मुलांना प्रथम प्राथमीक  आरोग्य केंद्र भुईज येथे व तेथुन ससाने हॉस्पिटल  पाचवड व तेथुन सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे घेवून गेले होते पण दुर्दैवाने तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . सातारा येथे पोष्ट मार्टम करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला  . या गंभीर घटनेची माहिती  भुईज पोलीस ठाणेचे सहा.पोलिस निरिक्षक आशिष  कांबळे यांना समजताच त्यांनी तातडीने  पिएसआय  निवास मोरे  पो.हवलदार  शिवाजी तोडरमल, बापुराव धायगुडे, दत्तात्रय धायगुडे, विजयराव देशमुख, आनंदराव भोसले,शंकरराव घाडगे यांना घटना स्थळावर पाठवुन घडलेल्या घटनांची माहिती घेतली .व वरील पोलिस पथकाला तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले . 
या दोन शाळकरी मुलांच्या मृत्यूने शिरगाव ता .वाई या गावावर शोककळा पसरली आहे .त्यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
To Top