दुर्दैवी ! सासरच्या छळाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या : वाई तालुक्यातील जोशीविहीर येथील घटना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील जोशीविहीर धोम पुनर्वसन येथे राहणाऱ्या .अनिता विशाल चव्हाण वय  १८ वर्ष या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून  राहत्या घरी साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली .या बाबतची तक्रार वडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अनिता विशाल चव्हाण वय १८ वर्ष राहणार जोशीविहीर धोम पुनर्वसन येथे पती विशाल सुरेश चव्हाण सासु अंजु ऊर्फ सुरेश चव्हाण सासरे सुरेश वसंत चव्हाण असे चौघेजण एकत्रीत राहण्यास होते या सर्वांनी अनिता हिचा माहेरुन व्यवसाया साठी  १०
 हजार घेऊन ये आणी तिच्या चारित्र्याचा संशय घेवुन तिचा नेहमीच अमानुष पणे छळ करीत होते या छळाची माहिती सौ.अनिताने आपल्या माहेरी आई वडिलांना वेळो वेळी  दिली होती.  
        पण या दररोज होत असलेल्या भांडणांमध्ये काहीच तोडगा निघत नव्हता .नवऱ्याने ऐकुन सासु सासर्यांनी देखील छळ सुरुच ठेवला असल्याने हा अमानुष पणे सुरु असलेला छळ सहन न झाल्याने अवघ्या एक वर्षा पुर्वी विवाह झालेल्या.अनिताने राहत्या घरातच साडीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली .
या बाबतची तक्रार मयत अनिताचे वडील संतोष हणमंत पवार राहणार पाचवड ता.वाई यांनी वरील तिघांन विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .हि तक्रार दाखल होताच भुंईज पोलिसांनी अनिताचा पती सासु सासरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे .
.
To Top