वाई ! आनंदपुर शिवारात पावसाचा कहर, लाखो रुपयांचे नुकसान : आमदार मकरंद पाटीलांनी केली पाहणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी  
वाई तालुक्याच्या ऊत्तर भागातील डोंगर कपारीत वसलेल्या आनंदपुर् गाव आणी शिवाराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने  शिवारातील शेतकर्यांच्या जमीनीतुन  पाण्याचे लोट वाहु लागले आणी हे पाणी  बघता बघता वाट मिळेल त्या त्या शेतातुन धावु लागले त्या मुळे जमीनींच्या ताला फुटल्याने अनेकांच्या जमीनीचा काही माती सह वाहुन गेल्याने   शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने आनंदपुर गावासह परिसरातील शेतकर्यांन मधुन हळहळ व्यक्त केली जात आहे . या घटनेची माहिती वाईचे आमदार मकरंद पाटील यांना समजताच ते तातडीने वाईचे तहसीलदार रंजित भोसले गटविकास अधिकारी नारायण घोलप विध्दुत मंडळाचे ऊपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांच्या सह कृषी विभागाचे अधिकारी गावकामगार तलाठी यांचा ताफा सोबत घेऊन 
नुकसान ग्रस्त आनंदपुर गावासह शेतशिवाराची
पाहणी करुन तहसीलदार रंजित भोसले आणी कृषी विभागाला तातडीने नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत .यावेळी आनंदपुर गावचे सरपंच संतोष साळुंखे उपसरपंच सुषमा शेडगे महादेव मस्कर शशिकांत पवार जेष्ठ कार्यकर्ते भानुदास साळुंखे 
नारायण साळुंखे रामचंद्र साळुंखे सुभाष गोळे 
बाळासाहेब पोळ पोपट गोळे चांदकचे सरपंच सोनाली संकपाळ उपसरपंच मोहन आबा मोरे
तंटामुक्ती अध्यक्ष सुनील दरेकर भरत भिलारे आशिष संकपाळ हे मान्यवर ऊपस्थित होते . 
आनंदपुर येथील एकलसळ शिवारातील संतोष लक्ष्मण साळुंखे बावरदाडा शिवारातील संदीप विलास सांळुखे चिखलदुत शिवारातील अनिल श्रीपती साळुंखे कुदांड शिवारातील सखाराम बाबुराव गोळे माथा परिसरातील यशवंत महादेव गोळे मेनवड शिवारातील लक्ष्मण गणपत जाधव चिरखा शिवारातील सुरेश रामराव साळुंखे माळ शिवारातील प्रमोद शिवाजी साळुंखे तर चांदक येथील सालपाई शिवारातील अशोक आबाजी स॔कपाळ यांच्या विहीरीचे मजबूत असलेले बांधकाम विहीरतच  कोसळले .झालेल्या मुसळधार पावसाने वरील शेतकर्यांचे प्रत्येकी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .या नुकसान ग्रस्त भागातील शेत शिवारातील भागाची मंडलाधिकारी गावकामगार तलाठी आणी कुषी सहाय्यक यांनी संयुक्तीक पाहणी करुन त्याचे पंचनामे करुन तातडीने तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्याचे वरील अधिकार्यांना लेखी आदेश काढले आहेत .अशी माहिती तहसीलदार रंजित भोसले यांनी दिली आहे .
गेल्या आठ दिवसा पासून बालेघरच्या डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस पडत होता त्याचे पाणी आनंदपुर येथील पाझर तलावात जाते तो सध्या भरुन वाहत असल्याने त्यातील पाणी चांदक गावच्या पाझर तलावात जाते पण तोही भरुन वाहत आहे .अशी अवस्था असतानाच सोमवार दि.१८ रोजी झालेल्या मुसळधार पावसाने उग्र रुप धारण करुन आनंदपुर आणी चांदक शिवारातील ओढ्या नाल्यांना आलेल्या पाण्या मुळे पुरपरस्थीती निर्माण झाल्याने येथील शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आणी चांदकचा तात्पुरता केलेला रस्ताही वाहुन गेल्याने नागरीकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करण्याची वेळ आली आहे .
To Top