बारामती ! .......घागरीवरील श्रीफळ फुटले आणि......! गावात नवचैतन्य बहरले : वाघळवाडी गावाची शेकडो वर्षांची परंपरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावांमध्ये दरवर्षी देवी उत्सवात अंबामाता मंदिरात घागरीवर ठेवलेल्या श्रीफळावर मारले जाते. आज पार पडलेल्या होमहवनाच्या कार्यक्रमात श्रीफळ फुटल्याने  गावात नवचैतन्य आणि गावावर कोणते संकट येणार नाही अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. मात्र यामध्ये श्रीफळ फोडताना घागर फुटली तर तो अपशकुन मानला जातो. पुर्वीपासुन परंपरेप्रमाणे चालत आलेली प्रथा गावकऱ्यांनी आजही चालु ठेवली आहे.
           वाघळवाडी  गावातील जागृत देवस्थान असलेल्या आंबामातेच्या मंदिरात  उद्यो उद्यो... उद्योच्या जयघोषात नवरात्र उत्सवाच्या दिवशी अष्टमीला    होमहवनाचा कार्यक्रम आज पार पडला . वाघळवाडी गावचे कुलदैवत असलेल्या आंबामातेच्या मंदिरात नवरात्र उत्सवात घटस्थापना करण्यात येत असते.नवरात्रात .तुळजापुरची आंबामाता , कोंढनपुरची तुकाईमाता व दुर्गामाता या देवीना  साडी-चोळी याचा पोशाख घालुन पीठा-मीठाचा जोगवा, खण नारळाची ओटी गावातील देवी भक्त अर्पण करतात. उत्सवामध्ये गावातील महीला व सर्व ग्रामस्थ रोज संध्याकाळी एकत्र येऊन देवीची मंदिरात पुजा- आरती करतात. नवरात्र उत्सवाच्या काळात देवीपुढे अखंड दिप लावला  होता.संध्याकाळी नवरात्रमध्ये दांडीयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.  विद्युत रोषणाई केलेले मंदीर गावच्या मध्य ठिकाणी असल्याने ग्रामस्थ दर्वर्षी मोठ्या उत्सवात नवरात्र उत्सव साजरा करतात. जागृत देवस्थान असेलेले आंबामातेच्या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे या मंदिरात नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी होमहवनाचा कार्यक्रम  होत असतो.  यावेळी देवीचा भक्त दिवसभर  उपवास करतो. मंदिराच्या गाभार्यात होमवन करुन मडक्याची घागर आणि त्यावरती श्रीफळ ठेऊन देवीच्या भक्त रात्रीच्या आठच्या दरम्यान हातातील जानवाने उद्यो उद्योच्या जयघोषात आणि ढोल ताश्याच्या गजरात घागरीवर ठेवलेल्या श्रीफळावर मारले जाते. आज पार पडलेल्या होमहवनाच्या कार्यक्रमात श्रीफळ फुटल्याने  गावात नवचैतन्य आणि गावावर  कोणते संकट येणार नाही अशी गावकर्यानी श्रध्दा केली.   पुर्वी पासुन  परंप्रमाणे चालत आलेली  प्रथा गावकर्यानी आजही चालु ठेवली आहे. .दसर्या दिवशी सीमालंगोनासाठी गावातील आंबामाता, हनुमान , ज्योतीबा, सावतामाळी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी, श्रीकृष्ण ,काळुबाई, दुर्गामाता या मंदिरात आरती करुन पताका घेऊन ग्रामस्थ एकत्र येऊन ढोल ताश्या ,झाज या वाद्यानी गावातून मिरवणुक काढण्यात येणार आहे. 
To Top