सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
नारायणपूर, ता पुरंदर जि पुणे येथील सासवड - कापूरहोळ रस्त्यावरील दत्त मंदीरा शेजारी एका महिद्रा कंपनीच्या XUV गाडीचा भीषण अपघात होवून त्यामध्ये दोन जनांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी असून त्यामध्ये तीन मुलींचा समावेश आहे.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात तेथीलच मेघमल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून उलटी झाली. अपघात ऐवढा भीषण होता की गाड़ी धडकून वाहनाचा जागीच चक्काचूर झाला होता. नारायणपूरचे स्थानिक नागरीक भानुदास बोरकर, रामभाउ बोरकर, सचिन झेंडे, भरतनाना क्षिरसागर यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून सासवड ग्रामीण रूग्णालय येथे उपचारकामी दाखल केले. त्यातील १. रचित मोहता वय १८ वर्षे, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल, २. गौरव लालवानी वय १९ वर्षे, रा रायपूर, छत्तिसगढ़ यांना डॉक्टरांनी दाखलपूर्व म घोषित केले. तर इतर पाच जणांना पुढील उपचारकामी ससुन रूग्णायल येथे हलवले. त्यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांचेवर ससुन रूग्णालय येथे उपचार चालू आहेत.
सदरचे विदयार्थी हे विविध राज्यातील असून ते सर्व MIT कॉलेज कोथरूड,पुणे येथे विविध विभागामध्ये शिक्षण घेत आहेत. सदर घटनेबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे हद्दीत अपघात दाखल झाला असून पोलिस निरीक्षक. आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक. विनय झिंजुर्के हे पुढील तपास करीत आहेत.