सैन्यदलातील भरतीचे आमिष दाखवुन तरुणांची फसवणूक करणा-या दोघांविरोधात गुन्हा दाखल

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नं. ७०८/२०२२, भा. दं. सं. कलम ४२० ३४ या गुन्ह्यातील फिर्यादी समीर त्रिंबक पवार रा. फडतरवाडी, पोस्ट विखळे, ता कोरेगाव, जि. सातारा या तरुणाने भारतीय - सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन कोलवडकर करिअर अॅकॅडमी, वडले, ता. फलटण, जि. सातारा या संस्थेमध्ये मे २०२२ मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी तेथील व्यवस्थापक रविंद्र नामदेव कोलवडकर रा. दालवडी, ता. फलटण, जि. सातारा व अवचित दादासो ताटे रा. वारुगड, ता. फलटण, जि. सातारा यांनी त्यांना सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी वय बसत नसल्याचे सांगुन वय कमी करुन देण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. त्यासाठी पुन्हा इयत्ता १० वी च्या परिक्षेला बसवुन १० वी पासच्या प्रमाणपत्राबरोबरच वय कमी करुन देण्याची व्यवस्था करुन पुढे भारतीय सैन्यदलात भरती करुन देतो, असे आमिष दाखवुन फिर्यादी यांच्याकडुन सुमारे ३ लाख रुपये स्वीकारुन त्यांची फसवणुक केली आहे.
         दरम्यानचे कालावधीत भारतीय सैन्य दलातील गोपनीय विभागास सैन्यदलाचे भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाल्यामुळे त्यांनी त्याबाबत सखोल गोपनीय चौकशी केली असता वरील प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत फिर्यादी समीर त्रिंबक पवार रा. फडतरवाडी, पोस्ट - विखळे, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी दिले तक्रारीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी याद्वारे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील युवकांना आवाहन केले आहे की, कोलवडकर करिअर अॅकॅडमी, वडले, ता. फलटण, जि. सातारा या संस्थेच्या वतीने जर कोणाकडुन भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले असतील तर तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
To Top