मुरूम चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

Admin
 
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
 नांदल ता. फलटण  येथुन सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या 400 ब्रास मुरूम गौण खनिजाची चोरी केल्या प्रकरणी लोणंद पोलीसात एकावर गुन्हा दाखल झाला.
       नांदल ता फलटण येथील  जमीन गट नं 395 मधील शारदा हणमंत बरकडे  यांच्या समाईक मालकीच्या शेतजमिनीमध्ये अविनाश दत्तात्रय कारंडे रा नांदल ता फलटण याने त्याचेकडील लाल रंगाचा टिपर MH 111558 व नवीन पिवळ्या रंगाचा जेसीबी यांच्या सहाय्याने सुमारे 2 लाख52 हजाराचा  400 ब्रास मुरुम गौण खनिजाची अनधिकृत पणे उत्खनन व वाहतुक करुन शासनाचा महसुल बुडवुन चोरी केली म्हणून  त्याचे विरुध्द तलाठी आकाश ढोमसे यांनी लोणंद पोलीसात तक्रार दिली. पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.
To Top