सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील खानापुर गावातील सेवा निवृत्त फौजी आणी सध्या वाई येथे कृषी विभागात पश्चिम भागातील बोरगाव येथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत
असणारा शंभुदास तुपे याच्या वर वाई पोलिस ठाण्यात विनय भंगाचा गुन्हा दाखल झाल्याने कृषी खात्यासह खानापुर गावात एकच खळबळ ऊडाली आहे .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खानापुर ता.वाई येथील रहिवासी असलेला फौजी शंभुदास तुपे वय ४५ हा आर्मी मधुन सेवा निवृत्त होऊन तो सध्या वाई शहरातील कृषी खात्यात नोकरीला आहे सध्या त्याची नेमणूक वाईच्या पश्चिम भागातील जोर खोर्यातील बोरगाव येथे केलेली आहे .या शासकीय सेवेत कार्यरत असताना या महाशयांनी काही दिवसा पुर्वी एका विधवा महिलेच्या घरात कोणी पुरुष माणुस नसलेचा गैर फायदा घेऊन तिच्या घरात अनेकदा घुसून तिच्या कडे वेळो वेळी शरीर सुखाची मागणी केली होती .या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने हि गंभीर बाब काही ग्रामस्थांना एकत्रीत करुन याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती .ग्रामस्थांनी देखील या फौजीला तुझ्या प्रवृत्तीत बदल करण्या साठी समज दिली होती पण या फौजी प्लस कृषी सहाय्यकअसणार्या शंभुदास काही सुधारला नाही .
याच कृषी सहाय्यकाने माझी कोन वाकडी करु शकत नाही मी फौजी आहे अशा भ्रमात राहून त्याने दि.९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा वरील विधवा महिलेच्या घरात घुसून तेथे राहत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीला वारंवार शरीर सुखाची मागणी करु लागला .घाबरलेल्या या तरूणीने दि.१० ऑक्टोबर रोजी थेट वाई पोलिस ठाण्यात जाऊन विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.हि तक्रार दाखल होताच वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या दाखल तक्रारीची गंभीर दखल घेऊन फौजी आणी कृषी सहाय्यक असलेल्या शंभुदास तुपे याच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत . या गुन्ह्याचा अधीक तपास करण्याचे आदेश महिला हवलदार श्रीमती के.ऐ.आवळे यांना देण्यात आले आहेत .
याच खानापुर गावातील ग्रामस्थांना भारतीय सैन्य दलाचा आणी त्या मधील आयुष्यातील १५ वर्ष निष्कलंक भारत मातेची सेवा बजावून सन्मानाने सेवा निवृत्त होऊन पुन्हा आपल्या मुळ गावी म्हणजे खानापुर गावात येताना त्याची येथील गाव कारभारी आणी ग्रामस्थ एकत्र येवुन गावाच्या प्रवेशदारात देश सेवेचा स्वाभिमान बाळगून फौजीचे वाजत गाजत जंगी स्वागत करुन त्यास घरा पर्यंत मिरवणूकीने घरपोच करण्याची परंपरा खानापुर गावाने जपली आहे .हा इतिहास गाव कारभारी आणी ग्रामस्थ स्वाभिमानाने सांगत असतात .पण या गौरवशाली परंपरेला आर्मी मधुन सेवा निवृत्त झालेल्या शंभुदास तुपे याने कलंकित केल्याची खंत खानापुर ग्रामस्थांच्या ह्रदयात घर करून बसली आहे .एका फौजी कडून अशा घाणेरड्या कृत्याची अपेक्षा नव्हती असेही ग्रामस्थांन मधुन बोलले जात आहे .