भोर ! संतोष म्हस्के ! काय तो धुव्वाधार पाउस .....! काय ती सडलेली पिके..... सर्व कसं एकदम भकास.....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात सर्वत्र आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे.या परतीच्या जोरदार पावसात कापणीस आलेली कडधान्य सोयाबीन, भुईमूग ,मूग,उडीद ही पिके शेतात पाण्याखाली गेल्याने सडून चालली असल्याने काय जोरदार पाउस- काय ती सडलेली पिके -सर्व काही भकास असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.
           भोर तालुका दुर्गम डोंगरी असल्याने महत्त्वाचे भात पीकाचे उत्पन्न घेतले जाते .सध्या परतीचा बरसणारा अवकाळी पाऊस भात पिकांसाठी फायद्याचा ठरत  असला तरी कडधान्य पिके पूर्णतः पाण्याखाली जाऊन वाया गेल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होऊन हवालदील झाला आहे.तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
------------------------------
नुकसान ग्रस्तांचे पंचनामे होणे गरजेचे
 सध्या भोर तालुक्यात अपेक्षा पेक्षाही परतीचा अवकाळी पाऊस जोरदार बरसत असल्याने हातात तोंडाशी आलेली कडधान्य पिके शेतातच पाण्याखाली असल्याने सोडून चालले आहेत.शासनाने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कडधान्य पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी असे वरवडी खुर्द ता.भोर येथील शेतकरी अरुण वरे व सागर वरे यांनी सांगितले.

To Top