जावली : धनंजय गोरे
हवामान बदलाचा कासच्या फुलांना फटका बसत असून यावर्षी चा पुष्प हंगाम समाप्तीकडे झुकला आहे. कास पठार कार्यकारी समिती कडून वीस ऑक्टोबर पासून ऑनलाईन बुकींग बंद करण्यात येणार आहे. तरीही प्रत्यक्ष पठारावर तिकीट घेऊन पर्यटकांना अजूनही पंधरा ते वीस दिवस फुलांचा आनंद घेता येणार आहे. पठारावर तिसऱ्या टप्प्यात येणारी मिकी माऊस व सोनकीची पिवळी धम्मक छटा अद्याप ही पाहावयास मिळत आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारा कास पठारवरील नैसर्गिक रंगीबेंरगी फुलांचा हंगाम सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.
राज्यासह देशविदेशातील पर्यटकांनी पठारला भेट देऊन येथील निसर्गाचा मनमुराद आंनद लुटला मात्र पठारावर सर्वात जास्त आणि प्रमुख आकर्षित ठरणारी गुलाबी तेरडा जातीची फुले आतिपावसामुळे अगदी कमी प्रमाणात उमलल्याने पर्यटकांची नाराजी पाहावयास मिळाली. मात्र पांढरा गेंद, निळी जांभळी सितेची आसव, कापरू, पिवळा मिकी माऊस व कुमुदिनी तळ्यातील कमळे हि जास्त प्रमाणात बहरल्याने पर्यटकांची खास आकर्षण ठरत होती. आता पठारावर पांढरा गेंद, पिवळी मिकीमाऊस व ईतर जातीची फुले आहेत मात्र जास्त प्रमाणात गवत वाढल्याने ती कमी प्रमाणात दिसत आहेत.
कास पठारावर यावर्षी फुले नसल्याची ओरड पाहायला मिळाली. वास्तविक ज्या भागात मानवी हस्तक्षेप कमी आहे व स्थानिक लोकांच्या जनावरांचा वावर आहे अशा पठारावरून महाबळेश्वर कडे जाणाऱ्या राजमार्गावर चांगली फुले पाहावयास मिळतात. कुमुदिनी तलावाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा फुलांचे गालिचे दिसत होते. पन येणाऱ्या पर्यटकांपैकी पन्नास टक्के पर्यटकच या भागात जातात. बाकीचे नेहमीच्या गेट क्रमांक एक व दोन मधेच पाहून जातात. त्याना फुलांचा आनंद घेता येत नाही. नेहमीच्या वर्दळीच्या भागातील फुले कमी झाली आहेत