सुपे परगणा ! 'सोमेश्वर'ने दिवाळी साखर वाटपाची मुदत वाढवावी : सुपे परिसरातील सभासदांची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या सुपे व सुपे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गासाठी सुपे याठिकाणी मध्यवर्ती ठिकाण म्हणुन साखर वाटप केंद्र देण्यात आले असुन दिपावली निमित्त या वाटप केंद्रात गर्दीचे प्रमाण वाढत असुन या केंद्रास दोन दिवसाचे वाटप असल्याने येथे शेतकरी मोठ्या संख्येने येत आहे ,
           यासाठी साखर वाटपासाठी अजुन दोन दिवस वाढवुन देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकरी व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे माजी संचालक गणेश चांदगुडे यांनी केली आहे ,
          शेतकरी वर्गास सोमेश्वर कारखाना परिसरातुन साखर खरेदीसाठी येण्या-जाण्यासाठी खर्च वेळ पाहता कमी ऊस उत्पादक शेतकऱ्यास मिळणारी साखर व खर्च हा समान होत असुन स्थानिक किराणा दुकानातील भावात ती साखर पडेल अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली, यामुळे कारखान्यांने सण उत्सव काळात किमान चार दिवस साखर वाटप सुरू ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे ,
To Top