वाई ! श्रीपाद जाधव यांची जिल्हा परिषदेच्या (ऊत्तर ) कार्यकारी अभियंता पदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी 
वाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडल्बुडीचे ) उपअभियंता या पदावर गेली तिन वर्ष अहोरात्र प्रामाणिक कष्ट करुन एक झुंजार संयमशील गर्वाचा लवलेश नसणारे भेटीला येईल त्याला चेंबर मध्ये थेट भेट देणारे एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण वाई तालुक्यात नावा रुपाला आलेले श्रीपाद रमेश जाधव यांची राज्य सरकारने  गेल्या वर्षी वाईच्या पश्चिम भागातील  दुर्गम आणी डोंगराळ भागातील जांभळी आणी जोर खोर्यात झालेल्या अतिवृष्टीत जवळ पास १५ पुल वाहुन गेल्याने जवळ पास १० ते १५ कोटींचे नुकसान होवुन जवळ पास या परिसरातील ४० गावांचा एक मेकांसी संपर्क तुटुन वाई प्रशासनाला बांधीत गावे आणी ग्रामस्थांना मदत पोहोचविण्याची प्रामाणिक इच्छा होती पण येण्या जाण्या साठी रस्ताच नसल्याने प्रशासन देखील अडचणीत सापडले होते .    
          महाराष्ट्राचे मंत्री मंडळ  देखील हादरुन गेले होते .त्या वेळी  असंख्य मंत्र्यांनी या भागात भेटी देऊन पाहणी केली होती आणी याच श्रीपाद जाधव या उपअभियंत्यास त्या वेळच्या लोक प्रतिनिधीन सह पालक मंत्र्यांनी 
तातडीने पुल बांधण्या साठी काय ऊपाय योजना कराव्या लागतील याची माहिती घेऊन निधी ऊपलब्ध करुन देतो पण पुलांची आणी रस्त्यांची कामे युध्द पातळीवर सुरू करा असे सांगितले होते जाधव साहेबांच्या सल्यानुसार  त्या वेळचे पालक  मंत्री बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील आमदार मकरंद पाटील या सर्वांनी  जाधव साहेबांच्या  नियचजनाचे कौतुक केले होते .अशा या कर्तबगार उपअभियंत्याने निधी येण्याची वाट न पाहता स्वताच्या विश्वासावर पुणे सातारा फलटण कोल्हापूर येथुन लागणारे साहित्य ऊपलब्ध करुन पुलांची कामे सोबत सर्व ठेकेदार आणी कार्यालयातील अधिकारी वर्गांना घेऊन रात्रीचा दिवस करुन तातडीने पुल आणी रस्ते तयार करुन ४० गावांचा वाहतुकीचा मार्ग सुरु केला अशा या जिगरबाज आणी कर्तव्यदक्ष असणार्या श्रीपाद जाधव या उपअभियंता पदावर काम करणार्या अधिकार्यास सातारा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती देऊन त्यांच्या आज वरच्या कार्याचा एक प्रकारे गौरव केल्याने वाई तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे .
To Top