सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्याच्या ऊत्तर भागात असणार्या चांदक गावाच्या ओढ्यावर पायपा टाकुन मजबूत पण तातपुरत्या स्वरुपाचा असणारा पुल काल रात्री झालेल्या मुसळधार पावसा मुळे
आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चांदक आनंदपुर परखंदी सटालेवाडी मुंगसेवाडी गुळुंब वेळे मार्गे जाण्या साठी संपर्क तुटल्याने चांदक गावातून शिरवळच्या एमआयडीसीत कामावर जाणार्या कामगारांना सह शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे . येथील कामगार वर्गांना शिरवळ एमआयडीसीत कामावर जाण्यासाठी तब्बल आठ किलोमीटरचे अंतर कापुन केंजळ मार्गे कामावर जाण्याची वेळ आली आहे .
घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की
वाई तालुक्याच्या अती डोंगराळ आणी दुर्गम भागातील चांदक हे गाव असुन येथील ओढ्यावर पुर्वी जुना पुलं होता पण तो अरुंदही होता पण त्याची आयुष्य मर्यादा संपल्याने तो वाहतुकी साठी धोकादायक बनल्याने तो कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडु नये याची खबरदारी चांदकच्या गाव कारभार्यानी घेऊन येथील भविष्यातील वाहतुकीचा विचार करुन ओढ्यावर दणकट आणी मजबूत पुलं असावा या साठी आमदार मकरंद पाटील यांच्या कडे नवीन पुलासाठी निधीची मागणी केली होती .
त्यामुळे हा पुल राज्य सरकारच्या अर्थ संकल्पीय योजनेत पीडल्बुडीचे त्या वेळचे उपअभियंता आणी दि.१८ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर बढतीने विराजमान झालेले श्रीधर जाधव यांनी या योजनेत या पुलाचे बांधकाम बसवून तब्बल ९० लाख रुपयांचा निधी चांदक ग्रामस्थांच्या पदरात टाकला अन जुलै महिन्यात या पुलाचे काम सुरु करण्यात आले होते . चांदक व परिसरातील शेतकर्यांची आणी शिरवळ एमआयडीसीत कामावर जाणार्या कामगारांची व इतर वाहतुक दारांची येण्या जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून चांदकच्या ओढ्यावर पायपा टाकुन तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता .पण दुर्दैवाने तोच रस्ता काल झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा
आलेल्या पुरा मुळे हा पर्यायी रस्ताच वाहून गेल्याने चांदक सह परिसरातील गावकर्यांन सह शेतकर्याना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे .