सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महूडे ता भोर येथील विकास कामांचे भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून काँग्रेस कार्यकर्ते खासदार सुप्रिया सुळे यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी नांद ता. भोर येथील रस्त्यावर थांबले होते. खासदार सुळे यांनी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व इतर कार्यकर्त्यांची भेट घेवून म्हणणे ऐकून जाणून घेतले व पुढील वेळेस दोन्ही काँग्रेस मिळून एकत्र कार्यक्रम घेऊ अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहिती देत खासदार सुळे शेतकरी मेळाव्यास रवाना झाल्या.
महुडे खुर्द ता.भोर येथील नीरा डावा कालव्याचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्या प्रसंगी खासदार सुळे मंगळवार दि.१८ बोलत होत्या.यावेळी खासदार सुळे यांनी बचत गटांच्या अनेक महिलांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,माजी जिल्हा बँक संचालक भालचंद्र जगताप ,माजी नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड ,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,चंद्रकांत बाठे,मानसिंग धुमाळ, युवक अध्यक्ष गणेश खुटवड आदींसह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------
मागील दोन वर्षे कोरोंना संसर्गाने राज्यात हाहाकार माजवला होता.मात्र न डगमगता महाविकास आघाडी सरकारने सामोरे जाऊन कोरोना काळात अतिशय उत्तम रित्या काम केले.या सरकारला कोविडच्या काळात नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने केले गेले व विकास कामेही केली गेली यामुळे महाविकास आघाडी सरकारचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.