बारामती ! सोमेश्वर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अमोल जगताप तर सेक्रेटरीपदी डॉ. राजकुमार गायकवाड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अमोल सुरेशराव जगताप, सेक्रेटरीपदी राजकुमार गायकवाड तर मुख्य सल्लागारपदी डॉ. गिरीश तवटे यांची निवड करण्यात आली आहे. 
               नुकतीच सोमेश्वरनगर येथे मेडिकल असोसिएशनची बैठक पार पडली यामध्ये ही निवड पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. सुधीर कदम यांनी मागील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. विलास काटकर, डॉ. गणेश जगताप, डॉ. प्रदीप भोसले, डॉ. मनोहर जगताप, डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. मयुर खटावकर व डॉ. किर्तीराज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top