सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली ता. बारामती येथील क-हा नदीतील पाण्याचे ओटीभरण - पूजन आज माजी सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य व समस्त महिला मंडळाच्या हस्ते करण्यात आले. बळीराजाला असेच सुखाचे दिवस येण्यासाठीची प्रार्थना उपस्थित ग्रामस्थांनी जलपुजन करताना केली.
काल दिनांक 17 रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे कऱ्हा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोरगाव, तरडोली, जोगवडी, आंबी बुद्रुक, माळवाडी, लोणी भापकर, व पुरंदर तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नाझरे धरण भरल्याने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज दि १८ रोजी सायंकाळी ५वाजता नदीतील पाण्याचे जलपूजन व ओटी भरण करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी गाडे , सागर वाघ, संजय भापकर, दिगंबर कदम, बाळासाहेब कांबळे, विनायक गाडे , श्रीकांत गाडे, आतिश भापकर व महीला मंडळ उपस्थित होते . या मान्यवरांच्या हस्ते ओटीभरण करण्यात आले. यावेळी उपस्थिती शेतकऱ्यांनी गावात अशीच सुजलाम सुफलामता यावी व शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येण्यासाठी प्रार्थना केली.