पुरंदर ! ओढ्याला आलेल्या पुरामुळे पांडेश्वर येथील ३७ वर्षीय युवक वाहून गेला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यासह पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस काल दिनांक 17 रोजी रात्रभर कोसळत आहेत. यामुळे कऱ्हा नदीला पुर आला असून ओढे , नाले , तलाव , बंधारे ओसंडून वाहु लागले आहेत .याच पावसाचे पावसाच्या पाण्यामुळे ओढायला आलेल्या पुरात पांडेश्वर येथील एक 37 वर्षीय युवक वाहून  गेला असल्याचे घटना आज घडली .       या बाबत सविस्तर वृत्त असे की ,  रोमणवाडी येथील युवक अजय व्यंकट शिंदे वय वर्षे ३७  हा दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी पांडेश्वर येथे आला होता.  साहित्य खरेदी करून परत  रोमनवाडी येथील घरी  जात असताना ओढ्यातील पाणी वाढले . या  पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.
       येथील स्थानिक तरुणांच्या साह्याने  अजय याच्या मृत देहाचा शोध कार्य सुरू होते.  काही तासानंतर याचा मृतदेह सापडला असल्याची  माहिती  पांडेश्वरचे पोलीस पाटील अरुण धुमाळ यांनी दिली.
To Top