सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील बारामती 'पोलीस' हे नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार आज नव्याने समोर आलाय. वाहतूक पोलिसांची बेजबाबदार कारवाई हा यातील मुख्य विषय आहे. एका बोगस गाडीचा ओरिजनल दुचाकी मालकाला दंड झालाय. यामुळे हलगर्जी पणा करणाऱ्या महिला पोलिसांची चौकशी व्हावी अशी मागणी आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर वाहतूक विभागाचे पोलीस गणवेशात कारवाई करीत असल्याचे आपण पाहतो. अशा ठिकाणी होणाऱ्या आर्थिक तरजोडी या सर्वांनाच ज्ञात आहेत. बारामतीच्या एका महिला कर्मचाऱ्यांनी बोगस कारवाई हा सध्या चर्चेचा विषय आला.
बारामती शहर वाहतूक विभागात हा प्रताप केलाय. नंबर प्लेट नसल्याच्या कारणावरून एका दुचाकी गाडी चालकाला फोटोसह ऑनलाइन पाचशे रुपये दंड केला. यावेळी वाहन चालकाची कागदपत्र अथवा ओळख पटवणे महत्त्वाचे होते. परंतु तसं काही घडलच नाही. ज्या गाडीला ऑनलाइन दंड केला ती गाडी दिवसभरात बारामती शहरात गेलीच नव्हती.
बारामती येथे पोलिसांच्या चुकीमुळे ओरिजनल दुचाकी चालकास 'न' केलेल्या गुन्ह्याचा त्रास झाल्याने हा प्रकार समोर आला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे.
COMMENTS