बारामती ! 'सोमेश्वर'ने जमा केला ऊसाचा अंतिम हप्ता, तसेच ठेवींवरील व्याज तर कामगारांचा बोनस व पगारातील फरकाचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी होणार जमा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांच्या खात्यावर १०३ रुपयांप्रमाणे प्रतिटन १०३ रुपये, ठेवींवरील व्याज आज सोमेश्वर कारखान्याने जमा केले असून  कामगारांना बोनस व पगार वाढीतील  पहिला हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार आहे. 
         गेल्या हंगामात सोमेश्वरने १३ लाख टन ऊसाचे गाळप केले असून त्याला ३ हजार २० रुपये दर दिला असून एफआरपी चे २८६७ पूर्वीच वर्ग केले असून ३०२० पैकी ५० रुपये भागविकास निधी वजा जाता उर्वरित प्रतिटन १०३ रुपये तसेच ठेवींवरील व्याज,आणि कामगार बोनससह कामगारांच्या पगार वाढीतील फरकाचा पहिला हप्ता वर्ग करणार असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी नुकतेच गव्हाण पूजन कार्यक्रम जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज कारखान्याने सभासादांच्या खात्यावर ऊसाचा अंतिम हप्ता व ठेवींवरील व्याज जमा केले. 
               गेल्या हंगामात १३ लाख टन ऊसाचे गाळप केले होते. त्यानुसार १०३ रुपयांप्रमाणे १३ कोटी ६५ लाख  तसेच वेगवेगळ्या कालावधीतील ठेवींवरील ४ कोटी रुपयांचे व्याज आज सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. 
          त्याचबरोबर कामगारांचा ३१ महिन्यांचा पगारातील फरक देणे असून यातील ११ महिन्यांच्या फरकाची २ कोटी रुपयांची रक्कम व कामगारांचा बोनस दिवाळीपूर्वी वर्ग करणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
To Top