सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
राजे प्रतिष्ठाण संचलित, मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), खंडुखैरेवाडी, सुपे, ता. बारामती, जि.पुणे ही संस्था सन २०१९ पासून सुरू झाली असून येथे इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर व वेल्डर अशा एकुण १४ तुकड्यातील विद्यार्थी यांना प्रशिक्षण दिले जाते. येथून प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना विविध कंपन्याचे कॅम्पस इंटरव्हयुचे आयोजन करून नोकरी दिली जाते व व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन दिले जाते. तसेच संस्थेतील या वर्षीच्या विद्यार्थ्याना दि.१०/१०/२०२२ ते १२/१०/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत टाटा मोटर्स व वाय फोर डी फाऊंडेशन मार्फत स्किल एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग देण्यात आले.
या ट्रेनिंग मध्ये विद्यार्थ्यामध्ये नेतृत्त्व कौशल्य, संवाद कौशल्य, मुलाखत कौशल्य, स्व-जागृती, ध्येय निश्चिती, वेळेचे व्यवस्थापन आणि (उद्योजिक) उद्योजक व व्यवसाय कौशल्य हया जीवनावश्यक कौशल्याची जोपासना कशी केली जाते. त्याचबरोबर जीवन जगताना पर्यावरणाबदद्ल, समाजाप्रती, कुंटूंबप्रती कृतज्ञ रहाण्याचे देखील सांगितले गेले ज्यामुळे मुलांच्या मनात वरील सगळ्याप्रती आदर निर्माण होईल.
हे ट्रेनिंग मयुरेश्वर आय टी आय, टाटा मोटर्स व वाय फोर डी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फिनीशिंग स्कुल इनिशियेटिव फॉर आय.टी.आयज हया सी.एस.आर. प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थ्याना सखोल कौशल्य विकास प्रशिक्षण विनामूल्य दिले आहे असे संस्थेचे अध्यक्ष दिलीप आप्पा खैरे व प्राचार्य उध्दव वाबळे यांनी सांगितले.