सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
भुईंज पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाचा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये सापळा रचून टाकलेल्या धाडशी छाप्यात दोन संशयीत आरोपींन सह एक चारचाकी वाहन १ लाख ५६ हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेऊन भुईंज पोलिस ठाण्यात आणुन त्यांना सपोनि आशिष कांबळे यांच्या समोर ऊभे करुन त्यांच्या कडे कसुन चौकशी केली असता त्यांनी दि.१ ऑक्टोबर रोजी जोशीविहीर येथील
मिठाईच्या दुकानातुन भर दिवसा १ लाख ८८ हजार रूपये
चोरुन पलायन केले असल्याची कबुली दिली .
या चमकदार कामगिरी मुळे आशिष कांबळे आणी डिबी पथकावर नागरीकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई
वाठार रस्त्यावर जोशीविहीर येथे असणार्या एका मिठाईच्या दुकाना जवळ एक चारचाकी गाडी येवुन थांबली या गाडीतुन सुनील प्रकाश साळुंखे वय ४२ आणी संतोष सहदेव साळुंखे वय ४५ असे दोघेजण खाली ऊतरले आणी समोरच असणार्या मिठाईच्या दुकाना समोर जाऊन ऊभे राहिले त्या वेळी त्यांना समोर खुर्चीवर एक बॅग ठेवलेली दिसली आणी वरील दोघांनी संगणमत करुन ति चोरुन घेऊन चार चाकीतुन पलायन केले होते .कही क्षणातच दुकानाचे मालक दुकानात आले त्या वेळी त्यांना बॅग दिसुन आली नसल्याने त्याची शोधाशोध केली असता ति मिळुन न आल्याने त्यांनी तातडीने भुईंज पोलिस ठाण्यात जाऊन रितसर १लाख ८८ हजार रुपये ठेवलेली बॅग कोणीतरी चोरुन नेहल्याची तक्रार दाखल केली होती .
हि तक्रार दाखल होताच भुंईज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांनी गंभीर दखल घेऊन याचा तातडीने शोध घेण्यासाठी डिबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास मोरे पो.हवलदार शिवाजी तोरडमल प्रशांत शिंदे सोमनाथ बल्लाळ रवीराज वर्णेकर कांबळे
गायकवाड यांचे तपास पथक तयार करुन त्यांच्या वर हा गुन्हा उघडकीस आणण्या साठीची जबाबदारी सोपवली .
वरील पथकाने घटना स्थळावर जाऊन परिसरातील सीसीटिव्हीचा आधार घेत तपास गतीमान करत वाठार पुसेगाव माळशीरस अकलूज या ठिकाणच्या रस्त्यावरील सीसीटिव्ही तपासले असता या मध्ये पलायन केलेल्या चोरट्यांची गाडी कैद झालेली दिसुन येत होती त्यामुळे या पथकाचे मनोबल आरोपींन पर्यंत पोहोचल्याचे वाढले होते तब्बल पाच दिवस हे पथक अहोरात्र हे आरोपी शोधण्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते
अखेर या पथकाला आरोपी अकलूज मध्ये असल्याचा सुगावा लागला अन पथकातील पोलिसांनी जिवावर उदार होऊन आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा लावुन छापा टाकला असता त्या ठिकाणी चारचाकी वाहनासह आरोपी आणी चोरुन नेहलेले १लाख ८८ हजार रुपये पैकी १लाख ५६ हजार रुपये हस्तगत करण्यास या पथकाला यश आले . या आरोपींच्या वर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे .