वाई ! मुलगी आणि बहिणीबरोबर बोलतो म्हणून मारहाण : भुईंज पोलिसांनी आठ जणांना केले गजाआड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ 
माझी मुलगी आणी बहीणी बरोबर बोलतो याचा राग मनात धरून पुण्याहून सातारा येथे स्वताच्या चारचाकी वाहनाने निघालेले सुजल शितल बारवाडे यांना आनेवाडी टोलनाका परिसरातील उड्डाण पुलावर आडवुन त्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढुन समीर ऊर्फ समीम सलीम शेख वय ४२ साहिल ऊर्फ भय्या समीर शेख वय १९ निनाद अजीत जगताप वय २१ विक्रम दत्तात्रेय जाधव वय २१ ऋषद विलास राऊत वय २१अमर गणेश पवार वय १९ मानस दिलीप माने वय २० श्रेयस सुधीर भोसले वय १९ सर्व राहणार सातारा या आठ 
जणांनी आपसात संगणमत करुन लाकडी दांडके आणी फायबरच्या काठीने व  लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली हे प्रकरण एवढ्यावर न थांबता बारवडे यांना वरील आठही जणांनी स्वताच्या फॅच्युरन गाडीत जबरदस्तीने उचलुन घालून आरोपीच्या घरी  नेहुन त्या ठिकाणी पुन्हा काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली होती .
             याची तक्रार सुजल बारवाडे यांनी भुईंज पोलिस ठाण्यात देताच घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि आशिष कांबळे यांनी वरील आरोपींना शोधुन काढण्या साठीची जबाबदारी पिएसआय रत्नदीप भंडारे हवलदार शंकर घाडगे चंद्रकांत भोसले आनंदराव भोसले आवळे डिबीचे सोमनाथ बल्लाळ रवीराज वर्णेकर सचिन नलवडे महिला पोलिस प्राची घोरपडे या पोलिस पथकावर सोपवली होती ..
या पोलिस पथकाने तांत्रिक लोकेशनचा आणी स्वताच्या बुध्दी कौशल्याचा वापर करुन कोंडवा पुणे येथुन पाच जणांना तर सातारा येथुन तीन असे आठ आरोपींना अटक करून त्यांना भुईंज पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे .
To Top