सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता बारामती येथील डॉ शशिकांत भगवानराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील शेतकरी कुटंबातील डॉ कदम हे गेल्या २२ वर्षापासून पुण्यात डॉक्टर म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांनी डॉ कदम यांना निवडीचे पत्र दिले आहे.