भोर ऑन दि स्पॉट ! संतोष म्हस्के ! भात जोमात...! तर कडधान्य कोमात...! संततधार पावसाने कडधान्य पिके वाया जाण्याची भीती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव,चाळीसगाव खोऱ्यात पावसाळा संपत आला असला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने खरीपातील कापणीस आलेल्या उभ्या कडधान्य पिकांच्या शेतात पाणी साचून राहिले आहे.परिणामी कडधान्य पिके शेतातच सडून चालली असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.तर शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
     पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाची संत धार सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांची खरीपातील कडधान्य पिके पेरणी करण्याची राहिली होती तर पेरणी करून झालेली सद्या कापणीस आलेली भुईमूग,सोयाबीन,घेवडा ही कडधान्य पिके  पावसामुळे काढणीविना शेतातच सडून चालल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जोरदार पाऊस नसल्याने जोमतत आलेल्या भात पिकांच्या शेतात पाण्याविना भेगा पडू लागल्याने भात पिकही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
To Top