सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील एकमेव निवडूक लागलेल्या भणंग ग्राम पंचायतीवर अपक्षांनी बाजी मारत श्री.पाडळेश्वर ग्रामविकास पॅनलचा मतदारांनी दारूण पराभव केला असुन अपक्षांना पसंती देत विकासाच्या चाव्या अपक्षांच्या हातात दिल्या असल्याने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडूकांना हा निकाल मार्गदर्शक ठरतो कि काय अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
भणंग ता. जावली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानात सर्व अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून सर्व जागा अपक्ष उमेदवारांनी मताधिक्याने जिंकल्या आहेत. सर्व अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळे हा निकाल सर्वांसाठीच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.
जावली तालुक्यातील भणंग या एकाच ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पहिल्या टप्प्यात जाहीर झाला होता. दरम्यान या निवडणुकीसाठी रविवार (दि.१६ ) रोजी मतदान पार पडले. यावेळी मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानात ८२ टक्के मतदान झाले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिन्द्र क्षीरसागर यांच्या श्री. पाडळेश्वर ग्रामविकास पॅनल व इतर सर्व अपक्ष उमेदवारांत ही निवडणूक रंगली होती. एकच पॅनल व इतर सर्व उमेदवार अपक्ष उभे राहिल्यामुळे या निवडणुकीची चर्चा सर्वत्रच होती. त्यातच या अधिकृत पॅनलचा पराभव करीत सर्व अपक्ष निवडणून आल्यामुळे भणंग गावासाठी हा निकाल धक्कादायक तर तालुक्यासाठी हा निकाल आश्चर्यचकित करणारा ठरला आहे. निवडून आलेल्या उमेदवारांवर इतर पक्ष आपला हक्क सांगत असून अपक्ष उमेदवार कोणाला पसंती देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
---------------------------
अपक्ष उमेदवारांच्या विजयाचे वाटेकरी
अपक्ष उमेदवारांच्या विजयात धनराज जगताप, मोहन जगताप, जितेंद्र जगताप, रामदास जाधव, अंकुश जाधव, दत्ता जाधव, रामदास भोसले, बबनराव गाडे, जनार्दन गाडे, आनंद जाधव, सुरेश निकम, कृष्णा जाधव, शामराव भोसले यांचा मोलाचा वाटा आहे.