वाई मॅरेथॉन रजिस्ट्रेशनसाठी वाईकरांचा उदंड प्रतिसाद

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--        
वाई : प्रतिनिधी                                            
टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशने आयोजित केलेल्या वाई तालुका व सातारा जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या गरवारे वाई हाफ मॅरेथॉन रजिस्ट्रेशनसाठी वाईकर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून रजिस्ट्रेशन 20 ऑक्टोबर पर्यंत खुले राहणार आहे.                                गरवारे वाई हाफ मॅरेथॉन 20 नोव्हेंबर रोजी द्रविड हायस्कूल वाई येथे सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे मॅरेथॉनचे हे तिसरे वर्ष असून या मॅरेथॉन ला  रजिस्ट्रेशन साठी उदंड प्रतिसाद मिळत आहे वाईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असताना दिसत आहेत. 21 किलोमीटर व 10 किलोमीटर या दोन मुख्य स्पर्धा असतील तर तीन किलोमीटर ही फन रन असणार आहे. द्रविड हायस्कूल, गणपती मंदिर, विश्वकोश,गंगापुरी, मेनवली भोगाव,धोम आणि धोम जलशया पासून पुन्हा द्रविड हायस्कूल अशी कृष्णा नदीच्या काठाहून जाणारी ही मॅरेथॉन आहे. आजूबाजूला हिरवा रम्य परिसर, डोंगर रांगा कृष्णा नदी व धोम जलाशय या मुळे धावपटूंना एक पर्वणीच ठरणार आहे सपाट व सुंदर रस्ता आणि उत्तम वेळ साधण्यासाठी धावपटू व नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. या आरोग्यदायी चळवळीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
To Top