सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या वरवे खुर्द ता.भोर येथील जलिदंर नारायण जाधव यांच्या घरात स्वयंपाकाचा गॅस चालु करीत असताना लायटर तात्काळ न सापडलेने गॅस पूर्ण घरभर पसरून स्फोट झाल्याची घटना शुक्रवार दि.२५ सकाळी घडली.
स्फोटात चार जण भाजून जखमी असून ससून रुग्णालय पुणे येथे उपचार घेत आहेत. दुर्घटनेत जलिदंर नारायण जाधव, कु. रिध्दी संदीप शितोळे (वय - ६ ),यश मोहन ताकवले (वय- ११) ,संदीप बाळासो कदम (वय - ३४) सर्व रा.वरवे खुर्द ता.भोर हे भाजलेने जखमी झाले आहेत. तर रिध्दी हीस पुणे येथे उपचारासाठी नेले आहे. शिंदेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरवे खुर्द येथील जलिदंर नारायण जाधव रा. वरवे यांचे घरात त्यांना चहा करणेसाठी घरातील गॅस चालु करीत असताना त्यांना लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरलेने स्फोट झाला.त्यावेळी संदीप बाळासाहेब थोपटे यांना मदतीसाठी जलिदंर जाधव यांनी बोलाविले होते.त्यावेळी प्रसंगावधान राखून थोपटे यांनी सदर घटने ठिकाणी गेले. तसेच घराजवळ लोकेश मोरे हे ही त्यांची कार घेउन मदतीसाठी धावले. त्यांच्या मदतीने जखमींना शिवापूर येथील श्लोक हॉस्पीटल येथे हलविले आहे. तर रिध्दी संदीप शितोळे हीस पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठविले आहे.पुढील तपास शिंदेवाडी पोलीस करीत आहेत.
COMMENTS