सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील भांबवडे येथील शेतकरी महिलेला शेतातच विजेच्या प्रवाहद्वारे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नसरापूर येथील किकवी राजगड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. हिराबाई दत्तात्रय कापरे (वय ५८) असे ज्येष्ठ महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिस विजय निवृत्ती सुर्वे (वय ३८) याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,भांबवडे (ता. भोर) येथील हिराबाई कापरे यांच्या दिराकडून विजय सुर्वे यांनी दिड गुंठा जमीन खरेदी केली आहे. परंतु शेतजमीन आणि विहीर याबाबत वाद सुरू असून त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. दि. १८ रोजी विजय सुर्वे यांनी हिराबाई यांना तुम्ही मला पाणी दिले नाही. तर मी तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली देण्यासाठी गेले असता त्यांना विजय सुर्वे हे लाईटच्या खांबा जवळ काहीतरी करत असल्याचे आढळून आले. मात्र कापरे नवरा बायको शेतीला पाणी देण्याच्या कामात असल्याने त्यांनी सुर्वे काही तरी विपरीत करत असल्याचे पाहूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर हिराबाई या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र काही ज्वारी भिजवत त्या पुढच्या चाऱ्यात त्यांनी पाऊल टाकले तेव्हा त्यांना विजेचा जोरात झटका बसला.
COMMENTS