सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी व वाघळवाडी या गावांची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातल्या आहेत. आज वाणेवाडी ग्रामस्थांनी सभा घेत बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने पाहिले सकारात्मक पाऊल टाकले आहे.
सकाळी दहा वाजता रामराजे मंगल कार्यालयात ही सभा पार पडली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले, सोमेश्वरचे माजी संचालक किशोर भोसले, उद्योजक राजेंद्र जगताप, कृष्णाई चे अध्यक्ष सुनील भोसले, दिग्विजय जगताप, adv. नवनाथ भोसले, पोपटराव भोसले, मोहनराव यादव,जाधव गुरुजी, प्रवीण भोसले, दुष्यंत चव्हाण, इंद्रजित भोसले, चंद्रशेखर जगताप, बाबासाहेब भोसले, नारायण जगताप, बाळासाहेब जगताप, कल्याण जगताप, हेमंत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पुरुषोत्तम जगताप म्हणाले, अपलेला इथे जनतेच्या सेवेसाठी ठेवले आहे. याच भान ठेवतानाचे दिसत नाही. गावाच्या विकासासाठी सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे काम आहे. ग्रामसभेला सर्वानी उपस्थित रहाणे गरजेचे आहे. आपले प्रश्न मांडले गेले पाहिजेत आणि ग्रामपंचायतने ते सोडवले पाहिजेत पण ग्रामसभेला ग्रामस्थ येतच नाहीत आणि मागून सदस्यांना नावे ठेवायची. ही बाब योग्य नाही.
आपल्या परंपरेप्रमाणे गावाची बिनविरोध हावी, स्वतःची पदरमोड, व वेळ देण्याचे काम करणारा गावाने उमेदवार ठरवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात संजय चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, गोपाळ चव्हाण यांनी चव्हाणवाडी ला सरपंचपदाची मागणी केली. कल्याण जगताप यांनी गावाचा विकास बाजूला राहिला ठेक्यासाठी यांची भांडणे होत आहेत असा आरोप केला. दुष्यंत चव्हाण म्हणाले, गावातल्या मुलांसाठी अभ्यासिका झाली पाहिजे. चव्हाणवाडी दत्तवाडीला संधी द्यावी, अन्यथा वेगळा प्रपंच मांडायला भाग पाडू नका. असे सांगितले. शिवाजी खोमणे, प्रशांत जेधे व दिलीप पवार यांनी मागील सदस्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.उद्योजक राजेंद्र जगताप यांनी गावाच्या विकासासाठी झटणारा, पळणारा उमेदवार असावा. सर्वांच्या विचाराने चांगला सरपंच निवडुया असे आवाहन केले.
सभेच्या शेवटी प्रत्येक वार्डमधील दहा जेष्ठ व तरुणांनी आपआपला उमेदवार निवडून गावाला तसे कळवायचे असे ठरले.