सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील शिरवली तर्फे भोर येथे शेतजमीनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हानामारीत मंगळवार दि.२२ ७ महिलांसह १३ जणांवर एकत्र जमाव जमवून मारामारी केल्याचा कारणावरून परस्पर विरोधी भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा विलास शिंदे व शिवाजी गंगाराम शिंदे यांच्या कुटुंबांमध्ये ही मारामारी झाली असून पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली फिर्याद शोभा विलास शिंदे वय- ६० यांनी दिली असून यामध्ये त्या शेतामध्ये गवत कापत असताना आरोपी शिवाजी गंगाराम शिंदे याच्यासह तानाजी शिवाजी शिंदे, अलका शिवाजी शिंदे, वर्षा तानाजी शिंदे व मुक्ता कडाळे यांनी त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे.पोलिसांनी या पाच जणांवर एकत्र जमाव जमवून मारामारीचा गुन्हा दाखल केला.तर दुसरी फिर्याद शिवाजी गंगाराव शिंदे याने दाखल केली. यामध्ये शेतात भाताचे कापलेले पीक ठेवल्याचा जाब विचारल्याने विलास सखाराम शिंदे, बाबू विलास शिंदे, सिध्दार्थ विलास शिंदे, संदीप विलास शिंदे, शोभा विलास शिंदे, रुपाली संदीप शिंदे, सारिका बाबू शिंदे व सुषमा सिध्दार्थ शिंदे यांनी त्यांस मारहाण केल्याचे म्हटले आहे.पुढील तपास पोलिस हवालदार राहूल मखरे करीत आहेत.