मेढा ! प्रभुचवाडी येथे अज्ञाताकडून ऊसाला आग : अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
मेढा - प्रतिनिधी
खर्शी तर्फ कुडाळ येथिल  रामचंद्र जाधव यांच्या प्रभुची वाडी ता. जावली येथिल ऊसाला अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याची तक्रार दाखल मेढा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
         प्रभुची वाडी येथे रामचंद्र जाधव यांनी गट नं. ८१ मध्ये वाघजाई नावाचे शिवारात ५० गुट्टे ८६३२ जातीचे ऊसाची लागवड केली होती. दि . २६ रोजी काही कामानिमित्त रामचंद्र जाधव सातारा येथे आले असताना त्यांना गावातील वैभव भोसले यांनी फोन करून तुमच्याकडे ऊसाची तोड आली आहे कि ऊस पेटविला आहे अशी विचारणा केली असता रामचंद्र जाधव यांनी तसे काही नसल्याचे सांगीतले.
           यावेळी जाधव यांनी पुतण्यांना फोन करून शेतात जावुन खात्री करण्याचे सांगितले तेव्हा खरेच ऊसाला आग लागलाचे सांगण्यात आले. त्यामुळे रामचंद्र जाधव यांनी मेढा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून त्याचा तपास पोलीस नाईक रोकडे करीत आहेत.
To Top