सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : प्रतिनिधी
मेढा - सोनगाव येथिल यश चिकणे हा मित्राबरोबर आर्डे गावच्या हद्दित मसाले भाताची पार्टी करण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहीरीत उतरताना शॉक लागुन त्याचा मृत्यु झाला असल्याचे नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सोनगाव ता. जावली येथिल यश गणेश चिकणे वय १८ हा लहान भाऊ आयुष चिकणे सह संकेत चिकणे वय १६, सत्याम चिकणे वय १८, विशाल पवार वय २० आणि कुणाल चिकणे वय २० सर्व राहणार सोनगाव हे मसाले भाताची पार्टी करण्यासाठी आर्डे नावाच्या शिवारात गेले होते.
येथिल शिवारात दु. ३.३० वाजण्याच्या सुमारास असणाऱ्या उमेश काटकर यांच्या विहीरीवर मसाले भात करण्यासाठी यश चिकणे हा पाणी घेण्यासाठी विहीरीच्या लोखंडी गजाचे पायरी वर गेला असता शॉक लागुन तो पाण्यात पडला व बुडून मरण पावला असलाची फिर्याद किरण तुकाराम चिकणे यांनी पोलीस ठाण्यात दिली असून त्याचा अधिक तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.