वाई ! शिरगावातील बोगस डॉक्टर भुईंज पोलिसांच्या जाळ्यात : शिरगाव येथील महेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यात काही वर्षांपूर्वी झालेले हत्याकांड हे अजून लोक मनातून व ध्यानातून विसरून गेलेले नाहीत हे हत्याकांड करणारा डॉ.पोळ याच्यावर अजून देखील कोर्टात खटला चालू आहे अशातच वाई तालुक्यातील शिरगाव गावात असाच एक व्यक्ती महेश शिंदे हा डॉक्टर असल्याचा सांगून स्थानिक लोकांचे औषधोपचार करत होता. 
          या सर्व गोष्टींचा सुगावा भुईंज वैद्यकीय अधिकारी यांना लागल्यावर त्यांनी भुईंज पोलिसांना सांगून त्यांना बरोबर घेऊन शिरगाव मध्ये जाऊन सर्व गोष्टी पाहिल्या तेव्हा महेश शिंदे हे शिरगाव मधील एका रुग्णाला तपासत होते. तेव्हा गुरनं 258/ 2022 वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33(1), 36 भादवीस, कलम 323,504,506 प्रमाणे कारवाई करण्यात आली तेव्हा त्याच्याजवळ दोन बीपी तपासणी मशीन,ऑप्टोमेट्री किट बॉक्स, वजन काटा, रक्तातील शुगर चेक करण्याचे मशीन, ऑक्सिमीटर, ड्रेसिंग पॅड, अल्ट्रा फोरसेट चिमटा, तूर्चा फॉरसेट, वाफारा देण्याचे फेसमास्क, हेयर क्लिपर, लहान कात्री अशा अनेक वैद्यकीय वस्तू हस्तगत करण्यात आल्या ही कारवाई वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भुईंज व पोलीस स्टेशन भुईंज यांनी केली याचा अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशन करत आहे.
To Top