वाई ! खानापुर ग्रामस्थांच्या निवेदनाची पोलिसांनी घेतली गंभीर दखल : वाईच्या डिबीने दारु अड्यावर टाकली धाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
खानापुर ता.वाई येथे गेली कित्येक दिवसां पासून दारु विक्रीचा अड्डा चालू असल्याने अनेक गरीब कुटुंबातील लोकांना त्याची झळ पोहचून कुटुंबे ऊध्दस्त होत होती त्याच बरोबर अनेक पुरुष वर्ग हा दररोज दारु पिवून आपल्या कुटुंबातील महिला आणी मुलांना अमानुष पणे मारहाण करत होते तर काही दारु पिवून निराधार महिलांच्या घरात घुसून दमदाटी करत शरीर सुखाची मागणी करत असत असे सर्व  प्रकार निव्वळ या दारु अड्या मुळे होतात त्या वर ऊपाय म्हणुन  दारु विक्रत्याला येथील गाव कारभार्यानी अनेकदा दारु धंदा बंद करण्या साठी सांगितले होते. 
               पण त्याच्यात कसलीच दुरुस्ती होत नाही हे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर संतापलेल्या नागरिकांनी अखेरचा ऊपाय म्हणुन शेकडो  ग्रामस्थांनच्या सह्यांचे निवेदन वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना   देऊन त्यात येथे सुरु असलेला दारु धंदा तातडीने बंद करुन विक्रत्यास तडीपार करण्याची मागणी केली होती .वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांन मध्ये ज्या ज्या ठिकाणी  बेकायदेशीर दारु मटका जुगार असे सुरु असल्याची माहिती नागरिकांनी वाई पोलिसांना गोपनीय पध्दतीने दिल्यास त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल . एकटे पोलिस अवैद्य धंद्यांना थोपवु शकत  नाही तर  त्या साठी नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे असे आवाहन बाळासाहेब भरणे यांनी नागरीकांना केले आहे . 
          राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या वाई तालुक्यातील खानापुर गावा मध्ये गेल्या कित्येक दिवसा पासून विना परवाना सुरु असलेल्या दारु अड्यावर वाई पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे 
यांच्या सुचने नुसार डिबी पथकाने टाकलेल्या धाडी मध्ये दोन हजार रुपये किमतीच्या २६ देशी विदेशी  दारुच्या बाटल्या जप्त करून सोबत दारु विकताना रंगे हात पकडलेली  पुजा सनी भोसले हिला ताब्यात घेतले आहे .  या पुर्वी जुलै महिन्यात वाईच्या डिबी पथकाने याच दारु अड्यावर छापा टाकुन पुजाचा पती सनीच्या भोसले यास अटक केली होती .या दोन्ही दारु विक्रेत्यांन वर वाई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे .वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे आणी डिबी पथकातील हवलदार  विजय शिर्के महिला पोलिस हवलदार  सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर यांनी सापळा रचून केलेली धाडसी आणी चमकदार कामगिरीचे खानापुर गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे ..
To Top